ॐ भूर्भूवः स्वः। तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात्।
मंत्राचा अर्थ : विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते; त्याचे आम्ही ध्यान करतो. तोच सच्चिदानंदरूप आहे. तो अज्ञानाचा नाश करतो.तो आमच्या बुद्धीला प्रेरणा देतो. त्याच्या तेजाचे आम्ही ध्यान करतो. आमची सत्कर्मे -सद्विचार-सदाचार-संभाषणे सद्वर्तनाकडे प्रवृत्त होवोत.
गायत्री मंत्राच्या या ओळी आयुष्याला मार्ग दाखवणार्या आहेत. याच प्रकाशाच्या मार्गाने वाटचाल आयुष्य सुकर करते!
आजपर्यंत विविध ब्लॉगच्या माध्यमातून आपण वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, रत्नशास्त्र अशा विविध शास्त्रांच्या बाबतीत माहिती घेतली. कुठल्याही शास्त्राचीउत्पत्तिहीमानवी जीवनाला सुरक्षिततेकडे व संपन्नतेकडे घेऊन जाण्यासाठीच झालेली असते. आपण ज्या शास्त्रांच्या संदर्भात चर्चा केली त्यांच्यातसुद्धा हाच समान दुवा आहे. या सर्व शास्त्रांच्या सहाय्याने आपण सुरक्षित वसंपन्न आयुष्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो!
मनुष्यप्राणी दिवसरात्र एक करून मेहनत करत असतो, शिक्षण घेत असतो,नोकरी-व्यवसाय करत असतो ते आपल्यासह आपल्या कुटुंबाचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठीच. भविष्याची चिंता ही माणसाला फार पूर्वीपासूनच सतावत आली आहे. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठीच हा सारा अट्टहास सुरू आहे. या स्पर्धेच्या जगात आणि अस्तित्व टिकवण्यासाठीच नव्हे तर दाखवून देण्याच्या काळात वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, रत्नशास्त्र हे सर्व आपल्या फायद्याचेच ठरत असतात. प्रत्येकाची स्वप्नं सारखी नसतात आणि सुखाची व्याख्याही सारखी नसते. कोणासाठी पैसा महत्वाचा असतो, कोणासाठी ज्ञान, कोणासाठी नातेसंबंध तर कोणासाठी छंद! ती स्वप्नं पूर्ण करून समाधानाने जगण्यासाठीच त्याची धडपड सुरू असते. जन्म आणि मृत्यू मानवाच्या हातात नसतात पण त्यादरम्यानचा जीवनाचा प्रवास मात्र माणूस स्वतःची ही स्वप्नं पूर्ण करण्यात मग्न असतो. या सगळ्यात वरील सर्व शास्त्र कशा पद्धतीने प्रभावीपणे भूमिका बजावू शकतात ते जाणून घेऊ!
आपल्या जन्मानुसार आपली जन्मपत्रिका बनते आणि त्यानुसार ज्योतिषशास्त्र आपल्याला आयुष्यातील विविध टप्प्यावर मार्गदर्शन करत असतं. आपलं जेंव्हा नाव ठेवलं जातं त्याच्या अनुसार आपल्याला अंकशास्त्रतून मार्गदर्शन मिळवता येतं. माणूस ज्या वास्तूत राहतो त्यानुसार वास्तुशास्त्रचा अभ्यास करून त्याला विविध समस्यांची सोडवणूक करता येते. माणसाचा स्वभाव जसा असतो त्यानुसार त्याला यश-अपयश मिळत असतं. जर स्वभावातील दोष कमी करून गुणांची वारंवारता वाढवायची असेल तर रत्नशास्त्राचा मोठा आधार आहे. अशा पद्धतीने आपण माहिती घेतलेलं प्रत्येक शास्त्र आपल्याला उपयुक्तच ठरत असतं.
आपण या सर्व शास्त्रांच्या बाबतीत माहिती घेतली आहे. या प्राचीन शास्त्रांचा योग्य उपयोग करून घेतला तर आपल्याला आयुष्यातील अनेक कटू प्रसंग टाळता येतात आणि समाधानाने जीवन जगण्यास मदत होते. आयुष्यात अनेक अशा घटना असतात ज्याला नेमकी कारण काय आहेत याचं स्पष्टीकरण मिळत नसतं. मग ते आरोग्य, धन यांची प्राप्ती न होणं असेल किंवा त्याचा क्षय होणं असेल. शिक्षण व करियरमध्ये मार्ग न सापडणे असेल किंवा वाट सापडूनही यश न मिळणे असेल. विवाह, संतती, कौटुंबिक नातेसंबंध या नाजुक बाबीही विनाकारण क्लेशदायक ठरत असतात. हे आपल्यासोबतच का होतं? याचं उत्तर सापडत नसल्याने नैराश्य येऊ शकतं आणि आयुष्य चुकीच्या दिशेने भरकटत जाऊ शकतं. आयुष्याच्या अशा अंधारलेल्या वाटेवरून जात असताना या सर्व प्राचीन विद्या आपल्याला प्रकाशवाट दाखवू शकतात. सावध वाटचाल करणे नेहमीच फायद्याचे ठरते. प्रश्न कुठलेही असोत, त्यावर उत्तरं असतातच. आपल्याला योग्य निर्णय घेऊन त्यातून मार्ग शोधावा लागतो. मुख्य म्हणजे या सर्वमध्ये आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहेत. कधी वास्तुशास्त्रातून मार्ग मिळतील तर कधी अंकशास्त्र मदत करेल. प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा आहे, आयुष्य वेगळं आहे, राहणीमान वेगळं आहे आणि अपेक्षाही वेगळ्या आहेत. असं असताना सर्वांना एकच उपचार लागू होणार नाहीत. समस्या कुठे आहे आणि अपेक्षा काय आहेत त्याचा अभ्यास करूनच योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. अनेकांची आयुष्यं यामुळे बदलून गेली आहेत. त्याची वाच्यता कधी उघडपणे केली जाते तर कधी त्या गोष्टी फक्त परिणाम दाखवत असतात.
या शास्त्रांची मदत घेत असताना महत्वाचा आहे तो तज्ञांचा सल्ला. हे विषय वाचून समजतील आणि केवळ वाचलेलं, ऐकलेलं अवलंबून समस्या सुटतील हे गैरसमज आहेत. आमचे आत्तापर्यंतचे ब्लॉग असतील किंवा इतर माध्यमातून मिळणारी माहिती ही वस्तुस्थितीचं आकलन करून देणारी असते. या विषयाचे महत्व सांगणारी व जागरूकता निर्माण करणारी असते. त्यातून आपल्याला मार्ग दिसेल. पण अनुकरण करायचं असेल तर मात्र योग्य व्यक्तीची, तज्ञांची, विशारदाची आवश्यकता असते. कारण लहानसा खोकला असताना घरी केलेले उपचार गुण दाखवतीलही, पण रोगाची-आजाराची व्याप्ती जाणून घेऊन त्यावर नेमका उपचार करण्यासाठी जसा स्पेशलिस्ट डॉक्टर लागतो तशातील हा प्रकार आहे. आपल्या वास्तूतील दोष, पत्रिके अनुसार मार्गदर्शन, स्वभावदोषांच्या अनुषंगाने राशीरत्न निवड असेल किंवा हस्तरेषा व अंकशास्त्रानुसार प्रश्नांची सोडवणूक असेल इत्यादी हे शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यासचं त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. अर्धवट ज्ञान हे नेहमीच घातक असतं आणि अज्ञानी माणसाचा सल्ला हा त्याहूनही अधोगतीकडे नेणारा असतो. त्यामुळे वेळीच विचार करून निर्णय घ्यावा आणि उत्कर्ष साधावा!!!