Hernia And Astrology

 हार्निया

मनुष्य  शरीराचे काही भाग हे आतून पोकळ असलेल्या भागात आसतात. त्या पोकळ स्थानांना शरीर नलिका  असे संबोधले जाते. ह्या नलिका आतड्याच्या आवरणाने झाकलेल्या असतात. कधी कधी हे आतडे फाटून त्यातून अंगाचा काही भाग बाहेर येतो. अश्या प्रकारच्या त्रासाला हार्निया म्हणजेच अंतर्गळ असे म्हणतात. आतडे  फाटल्या मुळे आतड्याचा आतील भाग बाहेर येतो व या बाहेर आलेल्या भागा मुळे त्वचेवर एक प्रकारचा फुगवटा दिसतो. जेथे हार्निया झाला आहे असा शरीराचा भाग काहीसा उतरल्या सारखा वाटतो. बाहेर आलेला हा भाग बोटाने दाबले असता आत मध्ये दाबला जातो व सोडताच फुग्या प्रमाणे परत बाहेर येतो.

हार्निया चे अनेक प्रकार आहेत, परंतु सामान्यतः हार्निया म्हटले कि त्याचा संबंध हा उदर हार्नियाशी असतो. हार्नियाचे जेथे होतो त्या स्थानानुसार वर्गीकरण केले जाते, ते असे …

  • कटीप्रदेश हार्निया
  • योनीमार्ग हार्निया
  • नितंब हार्निया
  • उदर हार्निया
  • नाभी  हार्निया
  • ओटी पोटाचा हार्निया
  • वक्ष हार्निया

या व्यतिरिक्त फ़ुफ़्पुस, मस्तिष्क इ. ठिकाणी सुद्धा हार्निया होऊ शकतो. हार्नियाचा त्रास हा जन्मतः  असतो किंवा अंग मेहनतीचे काम, अति वजन उचलणे, अपघात इत्यादी कारणामुळे होऊ शकतो.

सुरवातीस उलटी, मळमळ जाणवते, ओटीपोटात काळ मारून येते, अंतर्गत रक्तस्त्राव होतो. विष्ठेतून रक्त पडते किंवा रक्त मिश्रित विष्ठा होते.  वजन उचलतांना, व्यायाम करतांना त्रास होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.

ज्योतिष शास्त्र दृष्टीने विचार करता शनि, मंगळ, शुक्र, गुरु  ह्या ग्रहांन  बरोबर कन्या व वृश्चिक या राशींचा विचार करावा लागतो. या मधे शनि वृश्चिक किंवा कन्या राशीत असणे व लग्न स्थानाशी कोणत्याही प्रकारे संबधित असणे. वृश्चिक राशीतील शुक्र हा लग्नातील शनि ने दृष्ट असणे. तसेच चंद्र वृश्चिक असणे  किंवा वृषभ राशीत राशीत शनि, मंगळ, राहू, चंद्र, रवि ह्या पैकी कोणतेही ग्रह असतील तर वृषभ राशीच्या समोरील राशी म्हणजे वृश्चिक राशीवर परिणाम होऊन हार्निया होऊ शकतो.

ग्रह कारकत्वा नुसार गुरु हा मेद, वाढ, सूज, फुगणे इत्यादी चा कारक आहे तर शनि ह्या ग्रहाचा नैसर्गिक गुणधर्म रुक्ष आहे. कोणत्याही अवयवाला कठीणता आणणे, शारीरिक क्रियेत अडथळा आणणे हा आहे. शनि हा मास पेशींचा कारक सुद्धा आहे. शरीराच्या एखादा अवयवाला पीळ पडणे, राठ होणे हे शनीचे काम आहे. तसेच शनि  हा अति विलंबी व शरीरात घर करून बसलेल्या रोगांचा सुद्धा  कारक आहे.

हार्नियाचा त्रास कोणत्याही औषधांनी बारा होत नाही, तेथे शस्त्रक्रिया हि करावीच लागते.  कारण मंगळाशी संबधित आजार हे तीव्र परिणामाचे अत्यंत दाहजन्य असतात. मंगळ दाह व शस्त्रक्रिया दर्शवतो.

शुक्र हा ग्रह शरीरातील ग्रंथीची विकृत वाढ, ठराविक भागावर सुज येणे, गाठी होणे हे दर्शवतो.

कन्या राशी हि लहान आतड्यास चिटकलेली त्वचा, उदरात वेष्टन, पोटदुखी, आतड्यांचे विकार व आतड्यानमध्ये वेदना, आंत्रवष्टन दाह, जठरातर्गत धमन्या, यकृतातील शिरा, नाभिकमालातील शिरा आणि पक्काशायातील शिरा दर्शवते.

  वृश्चिक राशी ही त्रास, वेदना, शस्त्रक्रिया, लहान आतड्यातील धमन्या,  पक्काशायातील खालच्या भागातील धमन्या, पोटशुलोत्पादक शिरा दर्शवते.

पुरुष जातक

जन्म तारीख -०६ /११/१९७९

जन्म वेळ – पहाटे ०३ . ५२.००

जन्म ठिकाण  – नाशिक

पारंपारिक कुंडली प्रमाणे विस्लेषण

लग्न कुंडलीत

  • कन्या राशी लग्नी असून त्यात शनि आहे. वृश्चिक राशीत शुक्र असून त्यावर शनीची दृष्टी आहे.
  • अष्टम स्थानात मंगळाची मेष राशी असून त्याचा स्वामी मंगळ हा कर्क राशीत निचीचा आहे.
  • वृषभ राशीत चंद्र असून तो वृश्चीकेतील शुक्राने दृष्ट आहे.
  • षष्ट स्थानात शनिच्या राशीत केतु आहे
  • व्यय स्थानात राहू गुरु एकत्र असून गुरूची  सप्तम दृष्टी  षष्ट स्थानावर व नवम दृष्टी अष्टम स्थानावर आहे.

नवमांश कुंडलीत

  • षष्ट स्थानात कन्या हि राशी असून तेथे नीचेचा  शुक्र आहे.
  • अष्टमेश मंगळ व्यय स्थानात व त्याची षष्टावर पूर्ण दृष्टी.

कृष्णमुर्ती पद्धती प्रमाणे

के पी प्रमाणे हार्निया साठी षष्ट भावाचा उप नक्षत्र स्वामी, शनि, मंगळ, शुक्र, वृश्चिक किंवा कन्या राशी, अष्टम किंवा व्यय भाव ह्यांचा एकमेकांशी असलेला संबंध विचारात घ्यावा.

ह्या कुंडलीत षष्ट स्थानचा उप नक्षत्र स्वामी शनि आहे. शनि हा कन्या राशीत असून तो व्याय स्थानात आहे, तर त्याच्या मकर व कुंभ ह्या राशी अनुक्रमे पंचम व षष्ट भावारंभी आहे. शनीचा नक्षत्र स्वामी रवि हा द्वितीय भावात आहे तर त्याची सिंह राशी व्यय भावारंभी आहे.  शनि आस लिहत येईल –

शनि – १२   ५,६         शनिचा नक्षत्र स्वामी रवि – २  १२

येथे षष्ट स्थानाच्या उप नक्षत्र स्वामीचा हार्निया दर्शक शनि व कन्या राशी चा संबंध येत आहे तर आजार दर्शक १२ व ६ ह्या भावांचा संबंध आलेला आहे.

ज्या वेळेस त्रास होऊ लागला व आजार लक्षात आला त्या वेळी राहू महादशा व बुध अंतर्दशा चालू होती. आता राहूचे कार्यशत्व पाहू या

राहू हा व्यय भावात आहे. राहूवर कोणत्याही ग्रहाची दृष्टी नाही. राहू हा गुरु ग्रहाच्या युतीत आहे. गुरूची धनु राशी चतुर्थ भावारंभी तर मीन राशी हि सप्तम भावारंभी आहे. राहूचा राशी स्वामी रवि हा द्वितीयात आहे व त्याची सिंह राशी व्यय भावारंभी आहे. राहूचा नक्षत्र स्वामी केतू हा षष्ट भावात आहे. केतूवर गुरूची दृष्टी आहे. केतूचा राशी स्वामी शनि आहे. केतूचा नक्षत्र स्वामी राहूच आहे. तसेच राहूचा उप नक्षत्र स्वामी शनि आहे.  आता महादशा स्वामी राहूचे कार्यशत्व पुढील प्रमाणे लिहावे लागेल.

राहू –      १२                           राहूचा नक्षत्र स्वामी केतू  –    ६            राहूचा उप नक्षत्र स्वामी शनि – १२  ५,६ दृष्टी नाही                                  केतूवर दृष्टी  गुरु  – १२  ४,७ युती गुरु – १२                            युती नाही
राशी स्वामी रवि – २, १२              राशी स्वामी  शनि – १२  ५,६

अंतर्दशा स्वामी बुध हा वृश्चिक राशीत तृतीय स्थानात आहे तर बुधाची कन्या राशी लग्न भावारंभी तर मिथुन दशम भावारंभी आहे. बुधाचा नक्षत्र स्वामी शनि आहे तर उप नक्षत्र स्वामी चंद्र आहे. चंद्र हा नवम भावात वृषभ राशीत तर त्याची कर्क राशी एकादश भावारंभी आहे.

बुध  – ३  १,६                  बुधाचा नक्षत्र स्वामी शनि – १२  ५,६                    उप नक्षत्र स्वामी चंद्र – ९,११

अश्या प्रकारे महादशा व अंतर्दशा ह्या हर्निया आजार दर्शवतात

डॉ अभय अगस्ते 

Jyotish – Vastu Science Institute & Research Center